Uttar Pradesh News: सासूने परवानगीशिवाय मेकअप वापरल्याने महिलेले मागितला घटस्फोट, उत्तर प्रदेशातील विचित्र घटना
makeup Divorce PC twitter

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका महिलेने हद्दच पार केली आहे. एका महिलेने तिच्या पतीकडून घटस्फोट मागितल्याचे कारण हा मेकअप ठरला आहे. सासूने परवानगीशिवाय सूनेचा मेकअप वापरल्यामुळे पतीपासून विभक्त होण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे.या घटनेनंतर आग्रा शहरात एकच खळबळ उडाली आहे. मेकअप वापरण्याच्या मुद्द्यावरून सासू आणि सूने मध्ये वाद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,आग्रा येथील मालपूरा येथील रहिवासी असलेल्या महिलेने आपल्या पतीकडून घटस्फोटाची मागणी केली आहे. तिच्या सासूने परवानगीशिवाय मेकअप मागितल्याचे कारण समोर येत आहे. महिलेचे आणि तिच्या बहिणीचे आठ महिन्यापूर्वी दोन भावांशी लग्न केले होते. सासूला कोणत्याही कार्यक्रमाला जायचे असायचे तेव्हा तीने न विचारता मेकअप वापरायची. त्यानंतर सूनेने मेकअप वापरल्यामुळे सासूशी भांडण सुरु केले. सुरुवातीला छोटे छोटे वाद होऊ लागला. वादामुळे त्यांच्या भांडण होऊ लागले.

या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीला छळ करण्यास सुरुवात केली. तिच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली. भांडणानंतर पतीने पत्नीला आणि तिच्या बहिणीला घरातून हकलावून दिले.त्यानंतर दोघी माहेरी परतल्या. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने महिलेने पतीकडून घटस्फोट मागितला. महिलेने ही घटना पोलिस ठाण्यात सांगितली. पोलिस ठाण्यात महिलेने पतीविरुध्दात गुन्हा दाखल करून घेतला. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, पती नेहमी आईचे ऐकतो आणि माझ्याशी भांडण करतो. या कारणावरून महिला घटस्फोट घेत आहे.