UP Shocker: कारमध्ये लिफ्ट दिल्यानंतर महिलेवर सामुहिक बलात्कार, चार आरोपी अटकेत, बाराबंकीतील घटना
Rape case representaional photo

UP Shocker: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका ३० वर्षीय महिलेवर कारमध्ये लिप्ट देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची चार जणांना अटक करण्यात आली आहे. रियाझ, भुरे, शब्बू आणि इस्लामुद्दीन असं या चार आरोपींना अटक करण्यात आले आहे. 25 डिसेंबर रोजी ही घटना देवा कोतवाली भागात ही घटना घडली. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. बाराबंकी पोलिस ठाण्यातील एसीपी चिरंजीव नाथ सिन्हा यांनी पथक तयार करून आरोपींना ताब्यात घेतले.  (हेही वाचा- व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्यास महिलांकडून चोप (पाहा व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे सासरच्यांसोबत काही कारणावरून वाद झाला होता त्यानंतर महिला बाहेर पडल्यानंतर ती रस्त्यावर वाहनांची वाट पाहत होती. दरम्यान बिशनपूरच्या बाजूने एक कार आली त्यात चार जण होते. महिलेने आरोप केला आहे की, तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि एका निर्जन ठिकाणी एका टॉवरजवळ घरात नेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. आरोपी बलात्कार करून घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर महिलेने तिच्या मेहुण्याला फोन करून या धक्कादायक माहिती दिली.

या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी सर्व प्रथम आरोपी रियाझला पकडले आणि सीसीटीव्ही आणि त्यांच्या स्थानिकांच्या मदतीने इतरांना अटक केली. एकाही आरोपीचा या पूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. या घटनेनंतर