Photo Credit- X

Wild Elephant Tries To Enter House: तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये एका घटनेत जंगली हत्तीने (Tamil Nadu Wild Elephant) एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात तो अपयशी ठरला. अचानक आलेल्या हत्तीमुळे घरात उपस्थित असलेले लोक काहीकाळ घाबरले. हत्ती घरात शिरत असल्याचे दृश्य घरातील सदस्यांनी रेकॉर्ड केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हत्तीला घरात घुसता येत नसल्याने त्याने दरवाजाजवळ उभे राहून तांदळाचे पोते उचलले. ('Bought iPhone from Begging': भिकेच्या पैशातून खरेदी केला 16 प्रो मॅक्स; अजमेरमधील भिकाऱ्याने सर्वांना केले चकीत (Watch Video))

या घटनेत कोणत्याही नुकसानीची बाब समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोइम्बतूर जिल्ह्यातील थेरक्कुपलयम येथील एका घरात जंगली हत्ती घुसला. ज्यामुळे रहिवाशांमध्ये उत्साह आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. जंगली हत्ती घरात घुसला आणि तांदळासह अनेक वस्तू अस्ताव्यस्त करून निघून गेला. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे त्याने स्वयंपाक घरातील भांडी, खुर्ची त्याच्या सोंडेणे इतरस्त फेकले होते. हत्तीने त्याच्या सोंडेने गॅस सिलेंडरलाही स्पर्श केला.

सुदैवाने, घरात उपस्थित असलेल्या लोकांनी गॅस बंद केला होता. शेवटी, हत्तीने घरातून रेशन तांदळाची पिशवी घेतली. नंतर तो शांतपणे कोणताही त्रास न देता घर आणि परिसर सोडून गेला. कामगारांनी त्यांच्या मोबाईल फोनवर ही घटना रेकॉर्ड केली. त्यानंतर हा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला