Madhya Pradesh Shocker: माहेरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीची विहिरीत उडी मारून आत्महत्या, उज्जैन येथील धक्कादायक घटना
Well | Representational image (Photo Credits: pxhere)

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये गुरुवारी एका 27 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत सापडला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासातून असे समोर आले की, महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. महिलेने आत्महत्या करण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. (हेही वाचा- लखनऊमध्ये मुलींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी; केस ओढत, काठीने जोरदार मारहाण)

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथे महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या पतीने माहेरी जाण्यास परवानगी नाकारली होती.दोन दिवसांनीत गव्हाची कापणी होईपर्यंत तिच्या पतीने तिला थांबण्यास सांगितले होते. त्याच कारणाने तीने विहिरीत उडी मारली असं सांगण्यात येत आहे. पतीच्या निर्णयामुळे महिलेला राग अनावर झाला आणि तीने आत्महत्या केली. ममता असे महिलेचे नाव आहे. ती भैरवगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चित्रादेवी गावातील रहिवासी होती.

पोलिसांनी सांगितले की, ममता गेल्या काही दिवसांपासून तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी हद्द करत होती. परंतु तीचा नवरा केसर सिंग याने नकार दिला आणि सांगितले की गव्हाची कापणी पूर्ण होई पर्यंत थांबण्याची विनंती केली. या वरुन दोघांमध्ये भांडण सुरु झाले. भांडणात दोघांन्ही शिवीगाळ देखील केली. हीच गोष्ट असाहाय्य झाल्याने तीने आत्महत्या केली आणि तीचा मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे. पुढील चौकशी सुरु आहे. ममताचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला आहे.