Prime Minister Narendra Modi | (Photo Credits-ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Narendra Modi) आज देशातील विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोव्हिड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि देशातील मुख्यमंत्री यांच्यात व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारा चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांचाही यात समावेश आहे. दरम्यान, आज पंजाब, केरळ, गोवा,उत्तराखंड, झारखंड आणि ईशान्य भारतातील राज्यांसह 21 मुख्यमंत्र्यांसी नरेंद्र मोदी चर्चा करत आहेत. राज्यांमधील करोनाची स्थिती मला जाणून घ्यायची आहे. तसेच राज्यांमधली परिस्थिती काय आहे? त्याबाबत मला तुम्हा सगळ्यांचे सल्ले हवेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेचकोरोना विषाणू विरुद्धच्या लाढाईत भारत एकत्र होता, याची इतिहास दखल घेईल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

आपण करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जेवढे यशस्वी होऊ तेवढीच आपली अर्थव्यवस्थाही सुधारेल. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाल्यास सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये, मार्केट उघडू शकतील. दळणवळणाची साधणे सुरु होतील आणि तेवढ्याच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असेही मोदी यावेळी म्हणाले आहेत. याशिवाय, गेल्या काही आठवड्यात मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. देशात जवळपास सर्वप्रकारची दळणवळण व्यवस्था सुरु झाली आहे. जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. देशातील कोरोनाग्रस्तांना रिकव्हरी रेट 50 टक्क्यांपेक्षा जात आहे. लॉकडाउन शिथिल केल्याच्या घटनेला दोन आठवडे झाले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी सुचवलेल्या पर्यायांचा विचार करून पुढील नियोजन केले जाईल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी पहा

एएनआयचे ट्वीट-

भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 3 लाख 43 हजार 91 आकडा पार केला आहे. यापैकी 9 हजार 900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 80 हजार 13 जणांनी कोरोनावर मात केली आहे.