Bhopal: अरे देवा! हनिमूनसाठी जायचं होतं गोव्याला, पण नवरा घेऊन गेला Ayodhya ला; परत येताच संतप्त पत्नीने मागितला घटस्फोट
Divorce प्रतिकात्मक प्रतिमा (PC - pixabay)

Bhopal: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (Bhopal) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने लग्नाच्या पाच महिन्यांनंतरच पतीकडे घटस्फोट (Divorce) मागितला आहे. पतीने तिला हनिमून (Honeymoon) साठी गोव्याला (Goa) नेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याऐवजी तो तिला अयोध्या (Ayodhya) आणि वाराणसीला घेऊन गेला. एका अहवालानुसार, हे जोडपे त्यांच्या हनिमूनवरून परतल्यानंतर 10 दिवसांनी, 19 जानेवारी रोजी हे असामान्य प्रकरण भोपाळ कौटुंबिक न्यायालयात पोहोचले. हनिमूनसाठी परदेशात जाण्यासाठी पत्नी सतत दबाव टाकत होती. महिलेने घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे की, तिचा नवरा आयटी क्षेत्रात काम करतो आणि त्याला चांगला पगार मिळतो. याशिवाय महिला ही वर्किंग वुमन असून ती देखील चांगली कमाई करते, याचा अर्थ हनिमूनसाठी परदेशात जाणे त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हती. (हेही वाचा, Husband Wife Relationship: पहिली गेली दुसरी केली, पहिली पुन्हा आली दुसरीला हाकलली; पती आणि सवती विरोधात पीडितेची पोलिसांत तक्रार)

आर्थिक चणचण नसतानाही महिलेच्या पतीने तिला परदेशात घेऊन जाण्यास नकार दिला आणि भारतात कुठेतरी जाण्याची योजना आखली. पतीने दावा केला की त्याला त्याच्या पालकांची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर या जोडप्याने त्यांच्या हनीमूनसाठी गोवा किंवा दक्षिण भारतात जाण्याचे ठरवले. (हेही वाचा - Jharkhand HC Quotes Manusmriti: झारखंड हायकोर्टाकडून आदेशात मनूस्मृतीचा उल्लेख, म्हटले 'पती, सासू-सासरे यांची सेवा करणे पत्नीचे कर्तव्य')

तथापि, पतीने नंतर पत्नीला न सांगता अयोध्या आणि वाराणसीसाठी फ्लाइट बुक केली. त्याने तिला प्रवासाच्या फक्त एक दिवस आधी बदललेल्या प्रवासाच्या योजनांची माहिती दिली आणि सांगितले की, ते अयोध्येला जात आहे. कारण त्याच्या आईला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी शहरात जायचे होते. (हेही वाचा - High Court On Physical Intimacy: शरीरसंबंध नाकारणे वैहाहिक जीवनात क्रुरताच! घटस्फोटासाठी वैध कारण, हायकोर्टाचे मत)

तथापी, महिलेने या प्लानवर त्यावेळी कोणताही आक्षेप व्यक्त केला नाही आणि ती कोणताही वादविवाद न करता पतीबरोबर गेली. मात्र, तीर्थक्षेत्रावरून परतताच तिने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. तिच्या वक्तव्यात तिने असा दावा केला आहे की, तिचा नवरा तिच्यापेक्षा आपल्या कुटुंबातील सदस्यांची जास्त काळजी घेतो. दरम्यान, पतीने सांगितले की, त्याची पत्नी केवळ गोंधळ घालत होती. या दाम्पत्याचे सध्या भोपाळ कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन सुरू आहे.