पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: Getty Images)

विजयादशमी अर्थात दसरा (Dussehra 2021) हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी ऐकमेकांना आपट्याचे पाने वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. याचपार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, आताच्या घडीला देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन यंदाच्या सणाचा उत्साह द्विगुणित करता येणार आहे.

शारदीय नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस आई दुर्गाची पूजा केल्यानंतर आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण देशभरात साजरा केला जात आहे. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह, अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. हे देखील वाचा- Dussehra Messages 2021: दसऱ्याच्या निमित्त खास मराठी Wishes, Greetings, WhatsApp Status, HD Image शेअर करून द्या शुभेच्छा

नरेंद्र मोदी यांचे ट्वीट-

राहुल गांधी यांचे ट्वीट-

अमित शाह यांचे ट्वीट-

अरविंद केजरीवाल यांचे ट्वीट-

योगी आदित्यनाथ यांचे ट्वीट-

आजच्या दिवशी हजारो वर्षांपूर्वी भगवान रामाने रावणावर विजय मिळवला होता, म्हणून या दिवशी अनेक ठिकाणी रावणाचे पुतळे जाळले जातात. तर, याच दिवशी देवी दुर्गाने महिषासुरांचा वध केला होता, असे म्हटले जाते.