![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/12/Death-380x214.jpg)
Uttar Pradesh Shocker: गेल्या काही दिवसांपुर्वी कानपूरमध्ये (Kanpur) जंगली प्राण्याने चावा घेतल्याने पिता पुत्राचा मृत्यू झाला ही घटना ताजी असताना, उत्तर प्रदेशातात नवाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बरखान गावात तीन महिलांवर कोल्हाने हल्ला केला, तर एका महिलेला चेहऱ्याला चावला. पीडित महिलेचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. जंगलात गुरांसाठी चारा गोळा करत असताना, तिच्यावर कोल्हांनी हल्ला केला. कोल्ह्याने महिलेच्या गालावर चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार,तीन महिला जंगलात गुरांसाठी चारा गोळा करत असताना कोल्ह्यांनी हल्ला केला. कोल्ह्यानी तीन महिलेवर आक्रमक वृत्तीने हल्ला केला होता. एका महिलेच्या चेहऱ्यावर चावा घेतला. गावकऱ्यांनी हे पाहून लगेच मदतीसाठी धाव घेतला. त्या तिघींवर सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु होते. तेथून उपचारानंकर घरी सोडण्यात आले. मात्र, शुक्रवारी रेबीजची लागण झाल्याने एका महिलेची प्रकृती खराब झाली आणि पुन्हा तिला उपचारासाठी रुग्णालयात नेलं दरम्यान तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा- वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक
गावकऱ्यांनी मदतीला धाव घेतला म्हणून हल्ल्यातून दोघींचा जीव वाचला. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या घटनेची चौकशी करण्यासाठी गावात एक टीम पाठवू. जर गावकऱ्यांनी एका कोल्ह्याला मारले असेल, तर आम्हाला या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवावा लागेल.