Representational Image (Photo Credit: File Photo )

गृहमंत्रालयाचा अधिकारी (Home Ministry Officials) असल्याचे सांगत हरियाणाचे मंत्री रंजीत सिंह (Haryana Minister Ranjeet Singh) यांच्याकडून 3 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उपकार सिंह आणि जगतार सिंह, असे या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी गृहमंत्र्यांच्या नावावरून पैसे उकळण्या प्रयत्न केला होता. या दोघांनी 20 डिसेंबर ला एका अॅपच्या माध्यमातून रंजीत सिंह यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी रंजीत सिंह यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

या प्रकरणातील आरोपींनी रंजीत सिंह यांच्याकडे अमित शहा पार्टी फंडच्या नावावर 3 कोटींची मागणी केली होती. आरोपींनी या कामासाठी वापरलेल्या नंबरचा तपास केला असता हा नंबर अमित शहा यांच्या घरातून केला नसल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना बेड्या घातल्या आहेत, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. (हेही वाचा - बिहार: चोरट्यांनी ट्रक हायजॅक करून लुटला 3.5 लाखाचा कांदा)

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या उपकार सिंह आणि जगतार सिंह यांनी सांगितले की, आम्ही एका अॅपच्या माध्यमातून हरियाणा सरकारमधील मंत्री रंजीत सिंह यांना कॉल केला होता. या अॅपच्या माध्यमातून कॉल केल्यास आपला नंबर न दिसता दुसऱ्याचा नंबर दिसतो, असा खुलासाही या आरोपींनी केला आहे.