
तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये आज 69 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. यातील 63 जण दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, आज नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 690 वर पोहचली आहे. यातील 636 जणांनी दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यासंदर्भात तामिळनाडूच्या आरोग्य सचिव बीला राजेश (Tamil Nadu Health Secretary Beela Rajesh) यांनी माहिती दिली आहे.
देशात मुंबई, दिल्ली, तामिळनाडू, केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांतील अनेकांनी दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला तेलंगणाच्या 6 कोरोना रुग्णांनी हजेरी लावली होती. या 6 जणांचा तेलंगणामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या कोरोना रुग्णांमुळे कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या इतर नागरिकांना कोरोनाची लागण झाली. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना ग्रस्त व्यक्ती लॉकडाऊन मध्ये राहिली नाही तर, 30 दिवसांत 406 लोकांना करू शकते संक्रमित)
Today 69 people tested positive of which 63 persons are those who attended Tableeghi Jamaat event in Delhi.
Total number of positive cases in the state rises to 690 of which 636 are Tableeghi Jamaat attendees: Beela Rajesh,Tamil Nadu Health Secretary #COVID19 (file pic) pic.twitter.com/WfvVS4i1CQ
— ANI (@ANI) April 7, 2020
दरम्यान, भारतातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4421 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 354 नव्या रुग्णांची नोंद झाली. याशिवाय देशभरात विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3981 इतकी आहे. तसेच आतापर्यंत 325 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 100 हून अधिक झाली आहे.