देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची (Health Ministry) पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये दिल्या गेलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 354 प्रकरणे समोर आली आहेत आणि आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या लोकांची एकूण संख्या 117 झाली असून, आतापर्यंत एकूण 4,421 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यावेळी मंत्रालयाने एक महत्वाची माहिती दिली ती म्हणजे, जर का कोरोना ग्रस्त व्यक्ती लॉकडाऊनचे (Lockdown) अनुसरण करीत नसेल किंवा सोशल डीस्टन्सिंग ठेवत नसेल, तर अशी व्यक्ती 30 दिवसांत 406 लोकांना संक्रमित करू शकतो.
एएनआय ट्वीट -
A recent ICMR study shows that if 1 #COVID19 patient doesn't follow lockdown orders or practice social distancing, then the patient can infect 406 people in 30 days: Lav Aggarwal,Joint Secretary,Health Ministry https://t.co/cOk0St5WBx
— ANI (@ANI) April 7, 2020
आर गंगाखेडकर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी माहिती दिल्यानुसार आतापर्यंत 1,07,006 लोकांच्या कोरोना व्हायरसच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासाठी सध्या 136 सरकारी प्रयोगशाळा कार्यरत आहेत आणि 59 खासगी प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली आहे. लव्ह अग्रवाल, सहसचिव, आरोग्य मंत्रालय यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने 2,500 डब्यांमध्ये 40,000 आयसोलेशन बेड्स तयार केले आहेत. ते दररोज 375 आयसोलेशन बेड बनवत आहेत आणि हे देशभरातील 133 ठिकाणी सुरू आहे. (हेही वाचा: तबलीगी जमातीच्या लोकांचा किळसवाणा प्रकार; क्वॉरंटाइन सेंटरमधील खोलीबाहेर केली विष्ठा, FIR दाखल)
1,07,006 tests have been conducted till now. Currently, 136 government labs are working and 59 private labs have been given permission: R Gangakhedkar, Indian Council of Medical Research (ICMR) #Covid19 pic.twitter.com/SQBYV1httZ
— ANI (@ANI) April 7, 2020
लॉकडाउनबाबत अग्रवाल म्हणाले, विविध राज्य सरकार लॉकडाउनच्या कालावधीविषयी विचारात आहेत. तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यांनी केलेल्या या सूचनेवर विचार करीत असल्याचे केंद्राने म्हटले आहे. परंतु आता या विषयावर चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनबाबत ते म्हणाले, या उपचाराचा वापर केवळ विशिष्ट प्रकरणांमध्ये, जसे की क्रिटिकल केस आणि हेल्थ वर्करसाठी केला गेला आहे.