Coronavirus Cases In India: भारतात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोना बाधितांची संख्या 2902 वर पोहचली आहे. यात 2650 प्रकरणे सक्रीय असून 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, मागील 12 तासांत देशात 355 नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज देशातील विविध राज्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2547 इतकी होती. त्यापैकी 162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. तसेच कालपर्यंत 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. परंतु, आज देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. या आकडेवारीनुसार देशात 2650 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus: राजस्थानमध्ये 60 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 191 वर)
Coronavirus cases in India: There has been a spike of 355 cases in the country in the last 12 hours https://t.co/Rv6dAXDDg6
— ANI (@ANI) April 4, 2020
जगातील जवळपास सर्वच देशाला कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणुने युरोप आणि अमेरिकेत थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसात स्पेन आणि इटलीमध्ये कोरोनाने हजारो लोकांचा बळी गेला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेत शुक्रवारी एका दिवसात 1321 जणांचा मृत्यू झाला. तर जगभरात शुक्रवारी एका दिवसात 5972 जणांचा मृत्यू झाला.