Coronavirus: राजस्थानमध्ये 60 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 191 वर
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Coronavirus: राजस्थानमधील (Rajasthan) बिकानेर (Bikaner) येथे एका 60 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 12 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 191 वर पोहचली आहे. यातील 41 कोरोना रुग्णांनी दिल्लीतील तबलीगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. शुक्रवारी देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2547 पोहचली होती. यातील 162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज देशात आणखी कोरोना रुग्णांची वाढ होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -  Coronavirus: देशात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 2547; 162 जणांना डिस्चार्ज, 62 जणांचा मृत्यू - केंद्रीय आरोग्य मंत्रालय)

दरम्यान, आज आग्र्यामध्ये 25 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आग्रा जिल्ह्यात आतापर्यंत 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय शुक्रवारी कर्नाटक राज्यातील बागाल्कोट येथे एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारकडून नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, तरीदेखील लोक सरकारच्या सुचनांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.