Rape Stope | Representational Image (Photo Credits: File Image)

Hyderabad Minor Rape Case: तेलंगणातील हैद्राबाद (Hyderabad) मध्ये सातत्याने हृदयद्रावक घटना घडत आहेत. अशा घटना घडत असताना गुन्हेगार पोलिसांपासून पूर्णपणे निर्भय झाल्याचे दिसून येत आहे. हैदराबादमध्ये आठवडाभरात तिसऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, रविवारी हैदराबादमधील कालापत्थर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी 21 वर्षीय मोहम्मद सुफियान याला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी हैदराबादच्या चारमिनार येथे एका कपड्याच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम करते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद सुफियान 31 मे रोजी रात्री चारमिनार बस स्टॉपवर पीडितेला भेटला होता. तेथून तो तिला लँगर हाऊसमधील त्याच्या घरी घेऊन गेला. जिथे त्याने तिचा दोनदा बलात्कार केला. त्यानंतर सकाळी तिला बसस्थानकावर सोडले. यादरम्यान त्याने तिला त्याचा नंबरही दिला. (हेही वाचा - Shocking! मद्यधुंद व्यक्तीने 82 वर्षीय महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न; प्रायव्हेट पार्टमध्ये हात घालून धारदार शस्त्राने केली इजा, पडितेचा मृत्यू)

दरम्यान, या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने 5 जून रोजी पोटात असह्य दुखू लागल्याने तिच्या आईकडे तक्रार केली. त्यादरम्यान आईच्या चौकशीत पीडितेने संपूर्ण घटना कथन केली. यानंतर, पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या आईच्या तक्रारीवरून, पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363, 376 (2) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 5 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.

हैद्राबादमध्ये 28 मे रोजी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. तसेच यानंतर दोन तीन दिवसांनी म्हणजे 31 मे रोजी 11 वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली. एकापाठोपाठ अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनांमुळे हैद्राबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.