Madhya Pradesh News: कोणत्याही गुन्ह्याची किंवा आरोपीचा तात्काळ तक्रार दाखल करून घेणे हा एक कायद्यात तरतूद आहे.परंतु एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास पोलिसांने विलंब केल्याने महिलेने चक्क पोलिस ठाण्यात पीडितेने असं काही केलं ज्यामुळे संपुर्ण पोलिस ठाणे चर्चेत आहे. पीडित महिलेची महिनाभर झाले तरी देखील पोलिसांनी तक्रार नोंदवला नव्हता. त्यामुळे पीडित महिलेने पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची आरती केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (हेही वाचा- जन्मदात्या आईवडिलांकडून बाळाची हत्या, ठाण्यातील संतापजनक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 26 दिवस पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचा प्रयत्न करत होती. तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. मात्र त्यानंतरही पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास करावा लागेल, असं उत्तर दिलं. या सर्वांला कंटाळून आणि हताश होऊन महिलेने पीडितेला आरती आणि हार घेऊन पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याची आरती केली आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील रेवा येथील आहे. महिलेने हताश होऊन पोलिस अधिकाऱ्याची आरती केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी महिलेने असं केल. एकाने या घटनेचा व्हिडिओ काढला. अनेकांनी या व्हिडिओला कंमेट केले आहे.