Thane Crime: जन्मदात्या आईवडिलांकडून बाळाची हत्या, ठाण्यातील संतापजनक घटना
Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Thane Crime: आई वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ठाण्यात एका दाम्पत्याने बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळ 18 महिन्यांचे होते. हत्या करून बाळाचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला होता. घटनेची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच, ठाणे पोलिसाने आई सोबत वडिलांना अटक केले आहे. बाळाची हत्या का केली असा प्रश्न पोलिसांच्या समोर उभा होता. हत्ये प्रकरणी पोलिसांनी सर्व घटना समोर आणल्या आहे. मुलगी असल्याच्या संशयावरून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाची हत्या 18 मार्च रोजी केली. ठाणे पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जाहिद शेख (38) आणि नूरमी (28) या दोन आरोपी पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितले. चौकशीत आरोपींनी बाळा बद्दल काहीच माहिती दिली नाही. दोघे जण मुंब्रा येथील रहिवासी आहेत.  (हेही वाचा- दिल्लीच्या सीलमपूर मार्केटमध्ये एका अल्पवयीन मुलाने दिवसाढवळ्या व्यक्तीच्या डोक्यात घातली गोळी

पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे यांना एक पत्र मिळालं. ज्यात लिहलं होत की, दाम्पत्यांनी बाळाची हत्या करून स्मशानभूमीत पूरला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली परंतु दोघांन्ही सुरुवातीला काहीच सांगितले नाही. पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा बाळाची कशी हत्या केली हे सांगितले. परंतु बाळाली हत्या का केली हे अद्याप समोर आले नाही. त्यामुळे पोलिस आणखीन चौकशी करत आहे. या प्रकरणी दोघांवर आयपीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाचा मृतदेह जमिनीत पुरला होता तो पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.