राजधानी दिल्लीत गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या सीलमपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाने भरदिवसा एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी घातली आहे. दिल्लीतील सीलमपूर येथील खबरी मार्केटच्या ई ब्लॉकमध्ये ही घटना घडली. प्राथमिक अहवालानुसार, या व्यक्तीवर गोळी झाडणारा आरोपी हल्लेखोर वयाने अल्पवयीन असून तो 'मस्तान गँग'चा सदस्य आहे. ज्या व्यक्तीवर गोळी झाडली गेली त्याचे नाव शहनवाज असे आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा धक्क्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अल्पवयीन हल्लेखोर शहनवाजच्या अगदी जवळ येतो आणि त्याच्या डोक्यात मागच्या बाजूने जवळून गोळ्या झाडतो. घटनेनंतर पिडीत व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा: Viral Video: मॉलमध्ये खेळताना झाला मोठा 'गेम', बॉलिंग करताना आईने फोडला टीव्ही)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)