Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एका कॉलेजच्या विद्यार्थींनीला भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न फसला. रस्त्यावर उभी असताना अचानक एका कारमध्ये असलेल्या तरुणांनी विद्यार्थींनीला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. (हेही वाचा- महिलेचे जिंदाल स्टीलच्या CEO वर लैंगिक अत्याचाराचे आरोप; चेअरमन Naveen Jindal म्हणाले- 'आवश्यक कारवाई केली जाईल')
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यींनी बसची वाट पाहत बस स्थानकाजवळ उभी होती त्यावेळी एका कारमधील तिघांन्ही तिच्या लक्ष वेधून घेतले. तीला टारगेट करत तीची सोनसाखळी आणि पर्स खेचून घेऊन जाणाचा प्रयत्न करत होते. काही अंतरापर्यंत तीला फरफटत नेले. यशस्वीपणे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले परंतु विद्यार्थ्यींनीला कारने फरफटत नेल्यामुळे खाली पडली आणि जखमी झाली. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ही घटना मंडी पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग आयहूनजवळ घडली आहे.
पाहा व्हिडिओ
हिमाचल प्रदेश : मंडी जिले में छात्रा नेहा वर्मा बस का इंतजार कर रही थी। कार सवार गुंडे आए। बैग छीनने की कोशिश की। बैग छात्रा के गले में लटका था। इस कोशिश में छात्रा भी कार की खिड़की पर लटक गई और कुछ दूर तक घिसटती गई। पंजाब के 3 आरोपी पकड़े गए। pic.twitter.com/xRATSwrnic
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) July 19, 2024
तिघे आरोपी पंजाब येथील असल्याचे समोर आले आहे. कार पंजाब राज्याची असल्याचे व्हिडिओत दिसले. सुदैवाने विद्यार्थ्यींनीला लुटण्याचा प्रयत्न फसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली विशेष म्हणजे पोलिसांनी पकडू नये म्हणून त्यांनी कारची नंबर प्लेट बदलून टाकली परंतु पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान आरोपींना पकडले. या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु आहे.