Sexual Harassment Case: विमान प्रवासात लैंगिक छळाचे (Sexual Harassment) धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर अनन्या छौचरिया (Ananya Chhaochharia) नावाच्या महिलेने आरोप केला आहे की, जिंदाल स्टीलच्या (Jindal Steel) सीईओने कलकत्ता ते अबू धाबीला जाताना विमानात तिच्यासोबत गैरवर्तन केले. अनन्या छौचरियाच्या प्रोफाइलनुसार, ती सिटीझन फॉर पब्लिक लीडरशिपची सह-संस्थापक आणि पेंट इन रेडची संस्थापक आहे. आपल्या एक्स-पोस्टमध्ये तिने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आणि इतिहाद एअरवेजच्या सक्रियतेचेही कौतुक केले.
तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘मी एका उद्योगपतीच्या (जिंदाल स्टीलचे सीईओ दिनेश कुमार सरोगी) शेजारी बसले होते, त्यांचे वय 65 च्या आसपास असेल. त्यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, ते ओमानमध्ये राहतात. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संभाषण वाढवले. त्यांनी सांगितले की, ते मुळचे राजस्थानचे आहेत. त्यांची दोन्ही मुले लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. यानंतर त्यांनी संभाषण चित्रपटांकडे वळवले. नंतर त्यांनी त्यांचा फोन, इअरफोन काढून मला पॉर्न दाखवायला सुरुवात केली.’
पहा पोस्ट-
I was seated next to an industrialist (Dinesh Kr. Saraogi, CEO of Jindal Steel)
He must be roughly 65 in age & told me he now lives in Oman but travels frequently. He started chatting me up - very normal conversation about our roots, family etc
He is from Churu in Rajasthan...
— Ananya Chhaochharia (She/her) (@ananyac05) July 18, 2024
तिने पुढे नमूद केली की, ‘अश्लील व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांनी मला स्पर्श करायला सुरुवात केली. हे पाहून मला धक्काच बसला. शेवटी मी वॉशरूमकडे पळत गेले आणि एअर स्टाफकडे तक्रार केली. कृतज्ञतापूर्वक इतिहाद टीमने लगेच कारवाई केली. त्यांनी मला शांत केले आणि चहा व फळे दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अबू धाबी येथील पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. विमान उतरले तेव्हा पोलीस विमानतळावर होते. मी त्यावेळी लेखी तक्रार करू शकले नाही, कारण नाहीतर माझी पुढची बोस्टनला जाणारी कनेक्टिंग फ्लाइट चुकली असती. पोलिसांनी जेव्हा त्यांना (दिनेश कुमार सरोग) याबाबत विचारले तेव्हा त्यांनी ही गोष्ट नाकारली नाही.’ (हेही वाचा: Gang-Raped in Moving Car at Gwalior: धक्कादायक! ग्वाल्हेरमध्ये चालत्या कारमध्ये 13 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल)
नवीन जिंदाल यांची प्रतिक्रिया-
Dear Ananya, thank you for reaching out and speaking up! It takes a lot of courage to do what you did and I want you to know that we have a zero tolerance policy for such matters. I have asked the team to immediately investigate the matter and thereafter strictest and necessary…
— Naveen Jindal (@MPNaveenJindal) July 19, 2024
दरम्यान, या प्रकरणावर जिंदाल स्टीलचे संस्थापक नवीन जिंदाल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, ‘प्रिय अनन्या, ही गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही जे केले ते करण्यासाठी खूप धाडस लागते. मी टीमला या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यास सांगितले आहे आणि त्यानंतर कठोर आणि आवश्यक कारवाई केली जाईल.’