Accident (फोटो सौजन्य - ANI)

Prayagraj Accident: प्रयागराज मिर्झापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाला. भाविकांनी भरलेली बोलेरो आणि बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व जण छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील रहिवासी होते आणि संगम स्नानासाठी महाकुंभमध्ये (Mahakumbh 2025) येत होते. या अपघातावेळी, संगममध्ये स्नान करून वाराणसीला जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करणारे 19 भाविकही जखमी झाले. सर्व जखमींना सीएचसी रामनगर येथे दाखल करण्यात आले आहे. (MahaKumbh 2025 Guinness World Records: महाकुंभ 2025 मध्ये होणार अनेक विश्वविक्रम; गिनीज टीम प्रयागराजमध्ये दाखल, जाणून घ्या सविस्तर)

 10 भाविकांचा मृत्यू

बसमध्ये प्रवास करणारे सर्व भाविक मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बोलेरोमध्ये प्रवास करणारे सर्व भाविक छत्तीसगडमधील कोरबा येथील रहिवासी होते. जखमींच्या खिशात सापडलेल्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरवरून या सर्वांची ओळख पटली. पोलिसांनी सर्व दहा मृतदेह शवागारात पाठवले आहेत. कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

याआधीही महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती. ज्यात मोठ्या संख्येने भाविकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो जखमी झाले होते.