TamilNadu: ऑटोरिक्षात प्रवाशांना उत्तम सुविधा दिल्याने रिक्षा चालकाचे सोशल मीडियावर कौतुक, ग्राहकांना देतो 'या' सारख्या सुविधा
Auto-Rickshaws (Photo Credit - Twitter)

तमिळनाडूतील ऑटो-रिक्षाचालक (Auto-Ricksha) अण्णादुराई या व्यक्तीचे सोशल मीडियावर (Social Media) कौतुक होत आहे. अण्णादुराई हे गेल्या 10 वर्षांपासून चेन्नईमध्ये ऑटो-रिक्षा चालवत आहेत. त्यांच्या ऑटोरिक्षात प्रवाशांना उत्तम सुविधा दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यामध्ये लक्झरी गॅजेट्स आयपॅड, लॅपटॉप, स्नॅक्स, कोल्ड्रिंक तसेच फ्रीज आणि फ्री वायफायचा समावेश आहे. या सर्व गोष्टी ग्राहकाला प्रवासादरम्यान वापरता येतील. त्याची खास गोष्ट म्हणजे शिक्षक, डॉक्टर, परिचारिका आणि सॅनिटायझेशन सारख्या व्यवसायांशी संबंधित असणाऱ्या लोकांसाठी अण्णादुराई मोफत प्रवास देतात.

अन्नादुराई सांगतात, “मी गेल्या 10 वर्षांपासून चेन्नईमध्ये ऑटो-रिक्षा चालवत आहे. ऑटोमध्ये आयपॅड, लॅपटॉप, स्नॅक्स, शीतपेयांसह फ्रीज आणि फ्री वायफायची व्यवस्था आहे. माझा माझ्या ग्राहकांवर पूर्ण विश्वास आहे, म्हणून मी लक्झरी गॅजेट्स पुरवतो. माझ्यासाठी ग्राहकांचा आनंद पैशापेक्षा जास्त आहे.

Tweet

बारावीतच सोडावे लागले शिक्षण

अण्णादुराई म्हणतात की सुरुवातीला त्यांना लोकांची वाट पाहावी लागली आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की लोक त्यांची वाट पाहत आहेत. अन्नादुराई हे मूळचे चेन्नईतील तंजावर जिल्ह्यातील पेरावुरानी गावचे आहेत. त्याचे वडील आणि मोठा भाऊ दोघेही ऑटो चालक आहेत आणि आर्थिक अडचणींमुळे त्याला 12वीतच शिक्षण सोडावे लागले. पण अण्णादुराई यांनी हार मानली नाही आणि आपल्या नवीन व्यवसायात आपले ज्ञान आणि कौशल्य वापरले. सुरुवातीला त्यांनी ऑटोमध्ये न्यूजपेपर ठेवायला सुरुवात केली आणि हळूहळू सुविधा वाढवल्या. (हे ही वाचा Tamilnadu: लग्नादरम्यान वराला आला राग, नवरी मुलीला मारली कानाखाली, मुलीने लग्न मोडून केले चुलत भावाशी लग्न)

मोठमोठ्या कंपन्याही भाषणासाठी आमंत्रित करतात

अण्णादुराई हे व्यवसायाने ऑटो रिक्षा चालक असले तरी ते खुप छान इंग्रजी बोलतात. त्यांची प्रशंसा करणाऱ्यांमध्ये आनंद महिंद्रासारख्या व्यक्तीचा समावेश आहे. त्यांनी अण्णादुराई यांच्या व्यवस्थापन कौशल्याची प्रशंसा केली आहे आणि त्यांना 'व्यवस्थापनाचे प्राध्यापक' देखील म्हटले आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की मोठ्या कंपन्याही त्यांना भाषणासाठी आमंत्रित करतात.