Unnao Hang Brahmin Rapists: 'दोषींना तातडीने फाशी देण्यात यावी' हैदराबाद प्रकरणातील पीडिताच्या वडिलांची मागणी
Image Used For Representational Purpose | (Photo Credits: PTI)

हैदराबाद (Hyderabad) येथे बलात्कार आणि हत्या प्रकरण घडल्यानंतर उन्नावमध्येही (Unnao) एका तरुणीला गुरुवारी पहाटे एका तरुणीला रेल्वे स्थानकार पेटवून देण्यात आले आहे. त्यानंतर तरुणीला रेल्वे स्थानकाजवळील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यात पीडित 90 टक्के भाजली असून शुक्रवारी रात्री 11.40 च्या सुमारस तिने अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद पाठोपाठ उन्नाव मध्येही घडलेल्या धक्कादायक प्रकरणामुळे समाजात संतापजनक वातावरण निर्णाम झाले आहे. यावर हैदराबाद प्रकरणातील पीडिताच्या वडीलांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हैदराबाद येथे घडलेल्या प्रकार लज्जास्पद प्रकार घडल्यानंतर उन्नाव येथे बलात्कार झालेल्या पीडितेची हत्या करण्यात आली आहे. यावर हैदरबाद येथे बलात्कार आणि हत्या केलेल्या पीडितच्या वडिलांनी संताप व्यक्त करत आरोपींना मृतदंड व्हावा, अशी आशा व्यक्त केली आहे. हे फार वाईट आहे. पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे. लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा तयार केला पाहीजे. तसेच उन्नाव बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी हैदराबाद प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी केली आहे. हे देखील वाचा- Unnao Rape Case: दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेने घेतला अखेरचा श्वास

एएनआयचे ट्विट-

उन्नाव प्रकणातील पीडित तरुणीचा गेल्या वर्षी 2 तरुणांनी बलात्कार केला होता. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी फरार होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला 10 दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. गुरुवारी पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात पीडित तरुणी 90 टक्के भाजली होती. त्यावेळी स्थानिकांनी तातडीने पीडिताला जवळील रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, शुक्रवारी रात्री पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.