
Up Shocker: उत्तर प्रदेशात नाटक सादरीकरण करणं हे एकाच्या मृत्यूचे कारण ठरलं आहे. भागवत कथेच्या वेळी पौराणिक - धार्मिक कथेच्या नाट्यमय रंगमंचावर एक थरारक घटना घडली आहे. ज्यामुळे शहर हादरलं आहे. कानपूरमधील बंबैयापूर गावात पौराणिक धार्मिक कथेचे नाटक सादर केले जात होते. त्यादरम्यान देवी काली मातेची भूमिका साकारणाऱ्या 14 वर्षीय मुलाने 11 वर्षाच्या मुलाच्या मानेवर हल्ला केला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा- डॉक्टरांनी 5 वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED Bulb
अधिक माहितीनुसार, बुधवारी कानपूरच्या बंबैयापूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुभाष सैनी यांच्या कुटुंबीयांकडून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरी भागवत कथेचे आयोजन सुरु होते. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली, की नाटक सादरीकरणाच्या वेळीस देवी कालीची भूमिका करणारा १४ वर्षाच्या मुलाने ११ वर्षाच्या मुलावर चाकूने मानेवर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर जखमेमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळावरून १४ वर्षाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत मुलाचे वडील बबलू कश्यप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. आणि तक्रारीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध आयपीसीच्या कलम 304 अन्वये अविचारी किंवा निष्काळजी कृत्याने मृत्यू न मानता दोषी हत्या केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजकालाही ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार त्रिवेदी यांनी सांगितली.