चेन्नईमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, ज्यामध्ये एका 5 वर्षांच्या मुलाने एलईडी बल्ब गिळला होता व आता डॉक्टरांनी तो त्याच्या शरीरातून बाहेर काढला आहे. या मुलाने खेळताना चुकून एलईडी बल्ब गिळला, जो त्याच्या फुफ्फुसात जवळपास महिनाभर राहिला. आता डॉक्टरांनी छातीच्या ओपन सर्जरीशिवाय तो बाहेर काढला. श्री रामचंद्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बल्ब बाहेर काढल्यानंतर सहज श्वास घेण्यास सक्षम असलेल्या मुलाला दोन दिवसांनंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. एप्रिलमध्ये, मुलाने तो खेळत असलेल्या खेळण्यातील कारमधून हा एलईडी बल्ब गिळला होता. आता तीन बालरोग शल्यचिकित्सक आणि तीन भूलतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टीमने ब्रॉन्कोस्कोप- कॅमेरा आणि प्रकाशाने सुसज्ज लवचिक ट्यूब, वापरून हा बल्ब बाहेर काढला. (हेही वाचा: Man Dies Of Heart Attack At Gym: वाराणसी येथे जिममध्ये वॉर्मअप करताना व्यक्तीला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू)
पहा पोस्ट-
A five-year-old boy accidentally swallowed an LED bulb, which remained in his lungs for nearly a month before doctors removed it without open chest surgery.
In April, the boy ingested an LED bulb from a toy car he was playing with. https://t.co/H7TNYSXibS pic.twitter.com/IhLbIiDy9w
— The Times Of India (@timesofindia) May 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)