Asansol Ballygunge By-Poll Results 2022: पोटनिवडणुकीत भाजपला धक्का! पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात Shatrughan Sinha यांचा विजय; तर बालीगंज विधानसभा मतदारसंघात Babul Supriyo यांची सरशी
Shatrughan Sinha, Babul Supriyo (PC - ANI)

Asansol Ballygunge By-Poll Results 2022: चार राज्यांतील 5 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तीन जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) विजयी झाले आहेत, तर बालीगंज विधानसभा मतदारसंघात टीएमसीचे बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) विजयी झाले आहेत. त्याचबरोबर बिहारच्या बोचाहान विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे अमर पासवान यांनी विजय मिळवला आहे. 12 एप्रिल रोजी चार राज्यांतील 5 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते.

बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीत बाबुल सुप्रियो विजयी झाले आहेत. 19व्या आणि अंतिम फेरीत बाबुल सुप्रियो यांना 50 हजार 722 मते मिळाली. बाबुल सुप्रियो 9 हजार 904 मतांनी विजयी झाले. माकपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 30 हजार 818 मते मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला तिसरे स्थान मिळाले. भाजप उमेदवाराला 12 हजार 967 मते मिळाली आहेत. (हेही वाचा - Kolhapur Election Result 2022: कोल्हापूरात महाविकासआघाडीचा डंका, जयश्री जाधव विजयी; भाजपचा दणदणीत पराभव)

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, द्वेषी आणि अत्याचारीपासून मुक्त भारताच्या दिशेने पाऊल टाकल्याबद्दल आसनसोल आणि बालीगंजचे आभार. तुमचे (सार्वजनिक) कल्याण हे नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आसनसोल लोकसभेच्या मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून लिहिले की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निर्णायक जनादेश दिल्याबद्दल आसनसोल लोकसभा मतदारसंघ आणि बालीगंगे विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे मी मनापासून आभार मानते. आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद.