Amazon (PC - Pixabay)

Amazon Receives Notice: केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) अॅमेझॉनला 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस बजावली आहे. सीसीपीएने नोटीस जारी केल्यापासून सात दिवसांच्या आत अॅमेझॉनकडून उत्तर मागितले आहे. असे करण्यात कंपनी अयशस्वी झाल्यास त्याच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदीनुसार आवश्यक कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मुख्य आयुक्त रोहित कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखालील CCPA ने www.amazon.in वर ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ या नावाने मिठाई विकल्याप्रकरणी Amazon Seller Services Pvt Ltd विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. (हेही वाचा - Ram Lalla's Face Revealed: भाळी टिळा, हाती धनुष्य आणि स्मितहास्य देणार्‍या 5 वर्षाच्या भगवान श्रीरामाचे इथे पहा लोभस रूप! (View Pic))

व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) अहवालाच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद'च्या नावाखाली मिठाईच्या विक्रीशी संबंधित फसव्या व्यापारात अॅमेझॉनचा सहभाग असल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. (हेही वाचा -  Who Is Arun Yogiraj: MBA असूनही 5 पिढ्यांचा मूर्तिकलेचा वारसा जपण्याची निवड करणारा, अयोद्धेतील रामलल्लांच्या मूर्तीचा शिल्पकार अरूण योगीराज बद्दल जाणून घ्या खास गोष्टी! )

‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ असल्याचा दावा करणाऱ्या Amazon ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विविध मिठाई/खाद्य उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे CCPA ने निरीक्षण केले आहे.