आठवडयाच्या पहिल्याच दिवशी सोने व चांदीच्या दरात प्रचंड वाढ दिसून येत आहे. दिल्ली येथील सराफ बाजारात आज सोन्याचे किंमत (Gold Rate) 145 रुपये तेजीसह प्रति 10 ग्राम अशा दराने वाढलेले पाहायला मिळाले तर चांदीचे दरही 240 रुपये प्रतिकिलोने वाढलेले आहेत.
HDFC सिक्युरिटीज या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आजपासून सोन्याचा नवा दर प्रतितोळा 38 हजार 885 रुपये असेल. तज्ज्ञांनी दिलेला माहितीनुसार, याचं मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत.
दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने, या दिवशी सोने खरेदीसाठी प्रचंड मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली होती. तसेच मागील दहा वर्षातील सोन्याचा चढता भाव बघता या वर्षात झालेली सोन्याची दरवाढ ही विक्रमी मानली जात आहे.
पुढील काहीच दिवसात दिवाळीचा सण असल्याने लोकांनी खरेदीला सुरुवात आधीपासूनच केली आहे. परंतु वाढत्या सोन्याच्या दरामुळे सोने खरेदीकडे लोक पाठ फिरवू शकतात.