देशावर कोणतेही आर्थिक संकट नाही, प्रत्येक क्षेत्रात वेगाने विकास होत आहे- रविशंकर प्रसाद
Ravi shankar Prasad (PTI)

देशावर अर्थिक संकट निर्माण झाले आहेत, असे विरोधी पक्षांकडून वारंवार आरोप केले जात आहेत. यातच भाजप (BJP) नेते आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी देशावर कोणतेही अर्थिक संकट (Economic Crisis) नाही. उलट भारत अनेक देशांना मागे सोडून पुढे जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात विकास होत आहे, असे त्यांनी वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचेदेखील तोंडभरून कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश पूर्णपणे सुरक्षित आहे. रविवारी जयराम दास साह रोड, मालासामी येथे स्वर्गीय हीरा लाल साह यांच्या स्मृती दिनानिमित्त चॅरिटेबल ओपीडी आणि क्लिनिकचे उद्घाटन केंद्रीय मंत्र्यांनी केल्याचे ते म्हणाले आहेत.

एका कार्यक्रम दरम्यान भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी भारतात कशाप्रकारे विकास होत आहे, याची माहीती दिली आहे. भारताने विकासाच्या बाबतीत अनेक देशांना मागे सोडले आहे. यासंदर्भात रविशंकार यांनी विकासाचे अनेक मुद्दे मांडले आहेत. या दरम्यान ते म्हणाले की, "जीएसटी सुलभ करण्यात आला आहे. व्यापारी प्रामाणिकपणे व्यवसाय करतात आणि प्रामाणिकपणे कर भरत आहेत. प्राप्तिकर (Income tax Department) अधिकारी थेट त्यांना नोटीस पाठवू शकत नाहीत. हे बेकायदेशीर आहे. कृपया कोणाबरोबर असे घडल्यास त्यांना कळवावे. तसेच तिन्ही मंत्रालयाची जबाबदारी असताना ते प्रत्येक महिन्यातील 3-4 दिवस संसदेत असतात. हार्डिंग पार्क येथे 5 रेल्वे प्लॅटफार्म निर्मितीचे काम सुरु होणार आहे. पटना येथे 1500 सीटचा टाटा कंसल्टेन्सी सेंटर बनविण्यात येणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या 8 संस्था विकासाची कामे बघत आहेत. हे देखील वाचा- जम्मू-काश्मीरच्या सद्यस्थितीवर सरन्यायधीश रंजन गोगोई म्हणाले, गरज भासल्यास मी स्वतः श्रीनगरला जाईल

भारताची अर्थिक परिस्थिती मजबूत आहे. या विषयावर ते म्हणाले की, भारतात सर्वाधिक मोबाईल वापरकर्ते आहेत. तसेच भारतात तब्बल 268 मोबाईल कंपन्या कार्यरत आहेत. याबरोबर रविशंकर यांनी अनुच्छेद 370, तिहेरी तलाक, एअर स्ट्राईक आणि भारतीय सैनिकांचाही उल्लेख केला आहे. या दरम्यान, अनेक राजकीय नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, चॅरिटेबल ओपीडी आणि क्लिनिकमध्ये गरिबांवर मोफत उपचार केले जाणार आहेत, असेही ते म्हणाले