सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सांगितले की, गरज पडल्यास मी स्वत: जम्मू-काश्मीरला (Jammu Kashmir) जाऊ शकतो. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाकडून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी अझाद (Ghulam Nabi Azad) यांना श्रीनगर (Srinagar), जम्मू (Jammu), अनंतनाग (Anantnag) आणि बारामुला (baramulla) येथे जाण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, तेथे कोणत्याही प्रकारचे भाषण किंवा जाहीर सभा घेणार नसल्याचे, सीजेआय रंजन गोगोई यांनी सांगितले आहे. याशिवाय काश्मीर येथे सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत, असे न्यायालयाकडून केंद्र सरकारला सांगण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचे दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे सर्वत्र अशांतता निर्माण झाली आहे. यामुळे कल्याणकारी सुविधा आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून शाळा आणि महाविद्यालय सुरु करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. गुलाम नबी यांनी न्यायालयाकडे कुटुंबाची हालचाल जाणून घेण्यासाठी जम्मू काश्मीर येथे जाण्याची संमती मागितली होती. अझाद म्हणाले होते की, त्यांनी ही याचिका वैयक्तिकरित्या दाखल केली असून ही याचिका राजकीय नाही. याआधी गुलाम नबी अझाद यांना विमानतळावरुन माघारी पाठवण्यात आले होते. हे देखील वाचा-मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान; म्हणाले, गरज पडल्यास उत्तर प्रदेश मध्येही एनआरसी लागू करु
Chief Justice of India, Ranjan Gogoi, says in Supreme Court "if requirement arises, I may visit Jammu and Kashmir" https://t.co/uiLlcRFu0X
— ANI (@ANI) September 16, 2019
आज सर्वोच्च न्यायालायाने जम्मू काश्मीर संदर्भातील 8 याचिकेवर सुनावणी केली आहे. याआधी सीपीआय पक्षाचे नेता सिताराम येचुरी यांनी त्यांच्या पक्षाचे नेते तारीगामी यांच्याशी भेटाण्यासाठी श्रीनगर येथे जाण्याची परवानणी मागितली होती.