Bihar Rape Case: बिहारमध्ये शिकवणी वरून परतत असणाऱ्या 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार, गावकऱ्यांनी आरोपीला पोलिसांच्या हाती केले स्वाधिन
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

बिहारमधील (Bihar) नवादा जिल्ह्यातून (Nawada District) एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नवादा जिल्ह्यातील कादिरगंज पोलीस स्टेशन (Kadirganj Police Station) परिसरात राहणारा 9 वीत शिकणारी विद्यार्थीनी शनिवारी सकाळी 10 नंतर शिकवणीवरून घरी परतत होती. त्याचवेळी देवनापुरा (Devanapura) गावातील सचिन कुमार नावाच्या तरुणाने तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर त्याने मुलीवर जबरदस्तीने जवळच्या शेतात नेऊन बलात्कार (Rape) केला. बलात्कारानंतर तो पळून जात होता, मात्र पीडितेची ओरड ऐकून गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. ज्याला नंतर कादिरगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पीडितेच्या तक्रारीनंतर कादिरगंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात पाठवले. त्याचवेळी, पोलिसांनी आरोपीविरूद्ध POCSO लैंगिक अपराधांपासून संरक्षण आणि बलात्कार IPC चे कलम 376 यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हेही वाचा Nagpur Shocker: मोबाईल देण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाकडून 23 वर्षीय मित्राची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मामाच्या घरी शिकत होती. ती मूळची कोअकोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ती लहानपणापासून तिच्या आजोबांच्या घरी राहत होती. या प्रकरणात महिला पोलीस स्टेशनच्या SHO ला प्रकरणाचा तपास अधिकारी बनवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.