![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/06/01-61-380x214.jpg)
World's Highest Chenab Railway Bridge: जम्मू काश्मीरमध्ये बांधण्यात आलेल्या चिनाब रेल्वे पुलावर लवकरच ट्रेन धावणार आहे. चिनाब नदीवर सुमारे 359 मीटर उंचीवर बांधलेला हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी रविवारी रामबन जिल्ह्यातील सांगलदान आणि जम्मू काश्मीरमधील रियासी दरम्यान नव्याने बांधलेल्या चिनाब रेल्वे पुलाची पाहणी केली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. (हेही वाचा- रेल्वेमंत्री म्हणून अश्विनी वैष्णव दुसऱ्यांदा मंत्री पद संभाळण्यास सज्ज, कार्यलयात पंतप्रधानाचं कौतुक)
चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात एकूण 30,000 मेट्रेक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा पूल 1486 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. ते ताशी 260 किमी वेगाने वाऱ्याचा सामना करू शकते. हा पूल उधमपूर- श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे. ही ट्रेन 7 स्थानकांवरून बारामुल्लाला पोहोचेल.
रेल्वे मंत्रीने शेअर केला व्हिडिओ
1st trial train between Sangaldan to Reasi. pic.twitter.com/nPozXzz8HM
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 16, 2024
अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये असे लिहले आहे की, संगलदान ते रियासी पर्यंत आज पहिली ट्रायल ट्रेन यशस्वीपणे चालविण्यात आली आहे. यूएसबीआरएल मार्गाचे जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत. केवळ टनेल क्रमांक 1 ची काही जुजबी कामे शिल्लक आहेत. उधमपुरा श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प या वर्ष अखेरीस पूर्ण होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहेत.