Rahul Gandhi On PM Narendra Modi: राहुल गांधीचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, कोरोनाकाळात 5 लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू
Rahul Gandhi & PM Narenrda Modi (Photo Credit - FB/PBI)

कोरोना महामारीशी लढत देश पुढे जात आहे. पहिल्या लाटेपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेपर्यंत कोरोनाने देशातील करोडो लोकांना वेठीस धरले. त्याचवेळी, सरकारी आकडेवारीनुसार, देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 5 लाख 21 हजार 751 वर पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे आकडे खोटे ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, 5 लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलू देत नाहीत. ते अजूनही खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाला नाही! त्यांनी पुढे लिहिले की, मी याआधीही म्हटले होते - कोविडमध्ये सरकारच्या निष्काळजीपणामुळे 5 लाख नव्हे, तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर मोदीजींनी आपले कर्तव्य पार पाडत प्रत्येक पीडित कुटुंबाला 4 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असेही राहुल गांधी म्हणाले.

Tweet

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 558 वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 751 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 8 हजार 788 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 31 हजार 958 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.