Police Arrests 3 Aides of Terrorists Pc TWITTER

Punjab Police: पंजाब पोलिसांच्या अँटी - गॅंगस्टर टास्क फोर्सने बुधवारी अमृतसर परिसरातून दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा आणि लखबीर सिंग उर्फ लंडा हरिके यांच्या तीन साथीदारांना अटक केल्याचा दावा केला आहे. जोबनजीत सिंग उर्फ जोबन, बिक्रमजीत सिंग उर्फ बिक्का आणि कुलविंदर सिंग उर्फ काला अशी अटक केल्यांची नावे आहेत अशी माहिती पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी माहिती दिली.( हेही वाचा- पाकिस्तानने दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेण्याची भारताची मागणी)

अमृतसरमधील टी पॉईंट, सफीपूर- तरन- तारण रोड या गावाजवळून त्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी इंटेल- इनपूटच्या आधारे सापळा रचून अटक करण्यात आले आहे अशी माहिती डीजीपी यादव यांनी दिली. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून 10 जीवित काडतूसेसह 32 कॅलिबर पिस्तूल जप्त केले आहे. तसेच त्यांची स्फिट कार देखील जप्त केले आहे.

पंजाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोबान हा बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए), खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायदा, एनडीपीएस कायदा आणि आयटी कायद्याच्या गुन्ह्यांमध्ये होता आणि तो बरात काळ फरार होता. तर बिक्काही संबंधित दोन गुन्हेगारी प्रकरणांमध्ये होता. हत्येचा प्रयत्न. डीजीपी म्हणाले, "प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी त्यांच्या परदेशी हँडलरच्या निर्देशानुसार गुन्हेगारी कारवाया करत होते जेणेकरून सीमावर्ती राज्यातील शांतता आणि सलोखा बिघडला जाईल."