Pulwama Terror Attack Accused Dies: जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा येथे फेब्रुवारी २०१९मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी बिलाल अहमद कुचे याचे सोमवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जम्मू काश्मीरशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात बंद आरोपी बिलालची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्याला १७ सप्टेंबर रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवारी रात्री बलिलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (हेही वाचा- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन लष्करचे कमांडर ठार)
पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने कुचे आणि अन्य १८ आरोपीविंरुध्द २५ ऑगस्ट २०२० रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तो एक होता. कुचे आणि इतर आरोपी शाकीर बशीर, इंशा जान आणि पीर तारिक अहमद शाह यांनी जैश - ए -मोगम्मदच्या दहशतवाद्यांना त्यांच्या घरात सुरक्षित ठेवले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचा मृत्यू
32-year-old accused in 2019 Pulwama terror attack dies of heart attack in Jammu hospital: Officials
— Press Trust of India (@PTI_News) September 24, 2024
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल अहमद कुचेई हा काकापोरा येथील हाजीबल गावाचा रहिवासी होता. १९ आरोपींमध्ये त्याचा समावेश होता. स्फोट झाल्यापासून तो तुरुंगात होता. १४ फ्रेबुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भारताने ४० जवान गमावले होते.