पीएफ आणि पेंशन धारकांना झटका; बुडू शकते तुमच्या खात्यातील रक्कम
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI/File)

पीएफ (PF) आणि पेंशन फंड ही आपल्या निवृत्तीनंतरची पुंजी म्हणून ओळखली जाते. मध्यम  वर्गीय लोकांसाठी तर ही एकत्रित मिळणारी रक्कम फार महत्वाची ठरते. मात्र तुमची ही पीएफ आणि पेंशन फंडची रक्कम बुडण्याची शक्यता आहे. ज्यांचे पीएफ आणि पेंशन खाते आहे, त्यांचे एकत्रित तब्बल 20 करोड रुपये बुडू शकतात. कारण तुमचे हे कर्जाचे पैसे चक्क आयएलएफएस (investments in Infrastructure Leasing & Financial Services) कंपनीला कर्ज म्हणून दिले गेले आहेत. मात्र आता या कंपनीची आर्थिक स्थिती इतकी डबघाईला आली आहे की, ही कंपनी ही रक्कम परत करेल का नाही अशी शंका उपस्थित झाली आहे. (हेही वाचा : ‘ईपीएफओ’मध्ये लवकरच परिवर्तन; व्याजदरातही होणार मोठे फेरबदल)

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार फंड मॅनेजर्सनी ही पीएफची रक्कम बॉंड आणि कर्जाच्या रूपाने या आयएलएफएस कंपनीला दिले आहेत. त्यावेळी ही कंपनी डबघाईला आल्याची परिस्थिती होती. या कंपनीकडे सध्या 91 हजार करोड रुपये इतके कर्ज आहे. पैकी 61 टक्के हे बँकांकडून घेतलेले कर्ज आहे. तर 33 टक्के हे डिबेंचर्स आणि कमर्शियल पेपरच्या माध्यमातून उभे केलेले कर्ज आहे. त्यात एकूण पीएफच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम ही या कंपनीला कर्ज म्हणून दिली आहे, तर उरलेली रक्कम यस बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक, आणि बॅंक ऑफ बडोदा यांनी कर्जाच्या रूपाने दिली आहे.