प्रियंका गांधीनी साधला केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाल्या सरकार आपले डोळे कधी उघडणार?
Priyanka Gandhi (PTI)

सध्या भारतात (India) वाहन उद्योग क्षेत्रात भीषण परिस्थिती आणि मंदीची स्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते सरकार टिका करत आहेत. यातच काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून या संदर्भात सरकारवर (Central Government) निशाणा साधला आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच सरकार आपले डोळे कधी उघडणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रिंयंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हणाले की, अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने निघाली आहे. लाखो भारतीयांच्या डोक्यावर सध्या बेरोजगारीची टांगती तलवार आहे. वाहन उद्योगातील चित्र बोलके आहे. लोकांचा बाजारावरचा विश्वास उडू लागला आहे. एवढे सगळे घडत असताना सरकार आपले डोळे कधी उघडणार? असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (Society of Indian Automobile Manufacture) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या विक्रीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 31.57 टक्क्याची घसरण झाली आहे. तर प्रवाशी वाहनांच्या विक्रीमध्ये 49.09 टक्क्यांची घसरण झाली आहे. हे देखील वाचा- पाकिस्तानात भारतीयांवर अत्याचार; इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे माजी आमदार बलदेव कुमार यांच्याकडून भारताकडे आश्रयाची मागणी

माहितीनुसार, भारतात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ट्रक आणि बसच्या विक्रीमध्ये 39 टक्क्यांनी तर दुचाकी वाहनांमध्ये २२ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या भारतावर चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावर अनेकांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत.