पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: IANS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी अंदमान निकोबार द्वीपसमूहांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यावेळी 2004 रोजी आलेल्या त्सुसानी वेळी मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी तेथील जेल पाहिल्यानंतर रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी हॅवलॉक, नील आणि रॉक द्वीप यांचे नामकरण करण्यात आले आहे. तर अंदमान निकोबारला डीम्ड युनिव्हर्सिटीच सरप्राईज दिले आहे.

मोदींनी नरेंद्र मोदी यांनी हॅवलॉक चे नाव स्वराज्य द्वीप, नीलचे नाव शहीद द्वीप आणि रॉसचे नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप असे नामकरण करण्यात आले आहे.तर नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांनी देशासाठी केलेले प्रयत्न मोलाचे आहेत. तसेच बोस यांनी भारत स्वातंत्र्याचे अंदमानच्या द्वीपवरुन रणशिंग फुंकले होते. आझाद हिंद (Azad Hind) सरकारचे पहिले पंतप्रधान सुभाषजी बोस यांच्या संघटनेने अंदमान येथे तिरंगा फडकावला होता. त्यामुळे 30 डिसेंबर 1943 च्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

नेताजींच्या पावलावर पाऊल टाकत आज देशातील 130 कोटी भारतीय देश प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच अंदमान निकोबार येथील पाणी आणि विजेची समस्या सोडविण्यासाठी निरनिराळ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.तसेच 6 महिन्यात इथे 7 मेगावॉट सोलर पावर प्लांट्सला मंजुरी दिली आहे, असंही मोदी म्हणाले आहे.