madhya Pradesh PC TW

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सिधी जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी वीज नसतानाही मोबाईलच्या फ्लॅश लाईटच्या सहाय्याने रुग्णावर उपचार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रस्ता अपघातातील रुग्णावर उपचार केले. सोमवारी ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर अनेकांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिडिओ पाहून सिध्दी येथील सरकारवर संताप व्यक्त केला. (हेही वाचा- मेरठमध्ये भररस्त्यात बुरखा घातलेल्या मुस्लिम तरुणीचा विनयभंग; आरोपी अटकेत (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, सिधी जिल्ह्यातील एका गावात तब्बल ७ तास वीज खंडित होती. त्यामुळे गावकऱ्यांना बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागला. एका अपघातात रक्तस्त्राव झालेल्या तसेच  जखमी झालेल्या रुग्णावर मोबाईलच्या प्लॅश लाईटमध्ये डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. वीज खंडीत असल्यामुळे  जखमीवर तात्काळ उपचार मिळू शकले नाही. या घटनेनंतर जखमीच्या नातेवाईकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.

अशा परिस्थितीत रुग्णाची पत्नी गायत्री पांडे हिने प्रशासनावर संताप व्यक्त केला. आपल्या पतीचा रस्ता अपघात झाला. परंतु जेव्हा ते हॉस्पिटमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना आढळले की, तिथे वीज नाही. उपचार करण्यासाठी मोठे हाल होत आहे. डॉक्टरांनी उपचार सुरु केले पंरतु रुग्णालयात इतका अंधार आहे की काहीच दिसत नाही. डॉक्टरांनी मोबाईल फ्लॅशच्या मदतीने उपचार केले असे गायत्री पांडे यांनी व्हिडिओत सांगितले. रविवारी संध्याकाळी ७ च्या दरम्यान वीज खंडित झाली होती.८ तासांपेक्षा जास्त वेळानंतर सोमवारी वीज पुरवठा करण्यात आली.