Amit Shah Fake Video Case: 'व्हिडिओ पोस्ट करणे गुन्हा नाही', अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओप्रकरणी आरोपीला जामीन
Amit Shah (PC - Twitter)

Amit Shah Fake Video Case : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी(Amit Shah Fake Video) अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्याला दिल्ली न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला असून, त्यांनी तपासात सहकार्य केल्याने चौकशीची गरज नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे. 3 मे रोजी अरुण रेड्डी (Arun Reddy)यांना अमित शहांच्या बनावट व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आली होती. ते काँग्रेस(Congress)चे 'स्पिरिट ऑफ काँग्रेस' एक्स अकाऊंट हाताळत होते. आता त्यांना जामिन मंजूर झाला आहे. (हेही वाचा:Amit Shah Fake Video: अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक; कोण आहेत ते? )

न्यायमूर्ती नबिला वली यांनी सांगितले की, ज्या आरोपच्या आधारे त्याला अटक करण्यात आली तो म्हणजे पहिल्यांदाच कथित बनावट व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तथापि, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करणे हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. पुढे ते म्हणाले की, आरोपी 3 मे पासून कोठडीत असून तपास यंत्रणेने त्याची पोलीस कोठडी आधीच घेतली आहे. त्याशिवाय, आरोपीने तपास यंत्रणांना सहकार्य केले आहे त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडीची गरज नाही.(हेही वाचा:Viral Video: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांचे पथक पोहोचले तेलंगणा काँग्रेस कार्यालयात )

दिल्ली पोलिसांनी 3 मे रोजी रेड्डी यांना अटक केली होती. या दरम्यान, त्यांचा मोबाईल फोन यापूर्वीच जप्त करण्यात आला होता. गृह मंत्रालयाच्या (MHA) अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर विशेष सेलने एफआयआर दाखल केला होता, फेक व्हिडिओमध्ये अमित शाह मुस्लिम समुदायाचा कोटा संपुष्टात येण्याशी संबंधित त्यांचे विधान होते.