Amit Shah Birthday: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
Prime Minister Narendra Modi and BJP National President Amit Shah | (Photo Credit: bjp.org)

भाजप (BJP) पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा( Amit Shah) आज 55 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अमित शहा यांचा मूळ जन्म 1964 मध्ये मुंबईतील एका गुजराती परिवारात झाला होता. अमित शहा यांना सध्या राजकरणातील  'चाणाक्य व्यक्ती' म्हणून ओळखले जाते. खरंतर अमित शहा यांच्या आयुष्याची सफर ब्रोकर ते राजकरणापर्यंत अतिशय यशस्वी राहिली आहे. भाजप मध्ये त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद चोखपणे सांभाळले आहे. तर आज अमित शहा यांच्या वाढदिवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कार्यरत, अनुभवी, कुशल संघटक आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी अमित शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरकारमध्ये मोलाची भूमिका बजावण्याव्यतिरिक्त, ते भारताला सक्षम बनविण्यात आणि सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. देव त्यांना दीर्घायुष्य देवो आणि त्यांना सदैव निरोगी ठेवो.(Lok Sabha Elections 2019: अमित शहा यांच्या संपत्तीत गेल्या 7 वर्षात तिप्पट वाढ)

PM Narendra Modi:

तर अमित शहा यांना विविध क्षेत्रातून सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. शहा यांच्या राजकीय कामाबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी 2014 मधील लोकसभा निवडणूकीपूर्वी त्यांना राष्ट्रीय महासचिव पद देत 80 खासदारकीच्या उत्तर प्रदेशाचे प्रभारी कामकाज त्यांना देण्यात आले. त्यानंतर 2014 मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूकीत तिकिट देण्यात आल्यानंतर त्यांनी 80 मधील 71 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर शहा यांना पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले. जेव्हा दुसऱ्यांदा मोदी सरकारची सत्ता पुन्हा राज्यात प्रस्थापित झाल्यानंतर अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्री पदाचा भार सोपवण्यात आला आहे.