Lok Sabha Elections 2019: अमित शहा यांच्या संपत्तीत गेल्या 7 वर्षात तिप्पट वाढ
Amit Shah | (Photo courtesy: amitshah.co.in)

Lok Sabha Elections 2019: भाजप (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांच्या संपत्तीत गेल्या 7 वर्षात तिप्पट वाढ झाली आहे. शनिवारी (30 मार्च) अमित शहा यांनी गांधीनगर येथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी शहा यांच्या संपत्तीबाबत खुलासा झाला आहे. राज्यसभा सदस्य म्हणून देण्यात येणारे घरभाडे, मानधन आणि शेती यांमधून पैसे मिळत असल्याचे शहा यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

तर शहा यांच्या पत्नीची अच-अचल संपत्ती जवळजवळ 38.81 कोटी आहे. तर 2012 रोजी त्यांची संपत्ती 11.79 कोटी होती. तसेच शहा यांना वारसा हक्काने मिळालेली एकूण 23.45 कोटींची संपत्ती असून दोघांच्या बचत खात्यात 27.80 लाख रुपये आहेत. तसेच 9.80 लाखांची एफडी सुद्धा आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: बीएसफच्या माजी जवानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध निवडणुक लढवण्याची इच्छा)

2017 रोजी शहा यांनी राज्यसभेच्या सदस्यासाठी अर्ज भरला होता. त्यावेळी शहा यांची संपत्ती 34.31 कोटी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र आता शहा यांच्या संपत्तीत तिप्पट वाढ जवळजवळ 4.5 कोटी रुपयांनी वाढली आहे.