त्रिपूरा: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने पोलीस स्थानकात व्यक्तीला कानाखाली मारले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video)
Tripura Congress Leader Slap to person (Photo Credits-ANI)

त्रिपूरा (Tripura) येथील काँग्रेस (Congress) पक्षाचे अध्यक्ष प्रद्युत किशोर देव बर्मन (Pradyot Deb Burman) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांसमोर एका व्यक्तीला कानाखाली मारत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. कानाखाली मारत असलेले चित्र कॅमेऱ्यात दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानकात उपस्थित असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. तर आरोपीने काँग्रेस उमेदवार प्रज्ञा देव बर्मन (Pragya Deb Burman) यांच्या घोळक्यावर हल्ला केला होता. त्यामुळे प्रद्युत किशोर यांनी व्यक्तीला कानाखाली मारली असून तो सत्तारुढ आईपीएफटीचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

यावरुन प्रद्युत किशोर यांनी स्पष्टीकरत देत असे म्हटले आहे की, माझी बहिण प्रज्ञा हिच्यावर या व्यक्तीने वीट मारुन हल्ला केला होता. परंतु त्यामध्ये ती बचावली. प्रद्युत यांनी ही लाजिरवाणी घटना असल्याचे म्हटले असून माझ्यावर कारवाई केल्यास मी त्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. परंतु जे काही मी केले ते नात्यासाठी केले असल्याचे सांगितले आहे.(हेही वाचा-भर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली; चौकशी सुरु, पहा Video)

त्रिपूरा येथे 18 एप्रिलला होणारे मतदान रद्द करण्यात आले होत.तर आता येथे मतदान 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्रिपूराच्या पश्चिम मतदारसंघासाठी मतदान 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात पार पडले आहे.