Assembly Elections Results 2018 in Marathi: तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सकाळी 8 वाजल्यापासुन सुरू झाली आहे. मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. KCR म्हणजेच के. चंद्रशेखर राव यांच्याबाजुने एक्झिट पोलचे कौलदेखिल झुकलेले दिसत आहेत. राज्यात आज 7 डिसेंबराला मतदान पार पडलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेतील TRSला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, टीडीपी, तेलंगणा, जनसमिती आणि सीपीआय एकत्र आले आहेत.
TRS ने पार केला बहुमताचा आकडा. सध्याच्या माहितीनुसार TRS म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाकडे 84, कॉंग्रेस आणि टीडीपीकडे 26, भजपाकडे 3 तर इतर 7 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये Telangana Assembly Election Results 2018 : AIMIM नेते अकबरूद्दीन ओवेसी विजयी ठरले आहेत.
TRS प्रमुख के.चंद्रशेखर राव हे 50,000 मतांनी जिंकून आले आहेत. जिंकल्यानंतर राव कार्यालयाच्या मुख्यालयामध्ये आले होते.
Asaduddin Owaisi, AIMIM: I say this with all responsibility that K Chandrasekhar Rao has all capabilities & capacities to ensure that a non-Congress govt comes into existence when the next parliament election takes place & this country requires a non-Congress & a non-BJP govt. pic.twitter.com/P0XPQ9wexk
— ANI (@ANI) December 11, 2018
दरम्यान मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telangana), छत्तीसगढ (Chhattisgarh) , मिझोराम (Mizoram ) या राज्यंसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणुक (Assembly Elections) मतदान मोजणीला सुरूवात झाली आहे. Telangana Assembly Elections 2018 Exit Poll: तेलंगणामध्ये एक्झिट पोलच्या सर्वेनुसार TRS पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता
तेलंगणामध्ये 119 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. आता या राज्यात काय निकाल लागतो? के.चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.