Telangana Assembly Election Results 2018 : AIMIM नेते अकबरूद्दीन ओवेसी विजयी
AIMIM Leader Akbaruddin Owaisi | Image: Facebook

Assembly Elections Results 2018 in Marathi: तेलंगणा राज्यामध्ये 119 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणूक निकाल हळूहळू स्प्ष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. AIMIM  नेते  अकबरूद्दीन  ओवेसी ( Akbaruddin Owaisi) चंद्रायान गुत्ता   ( Chandrayan Gutta ) मतदारसंघातून निवडून आले आहेत. इतर राज्यांमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असले तरीही तेलंगणामध्ये TRS आघाडीवर आहे.

 

KCR म्हणजेच के. चंद्रशेखर राव यांच्याबाजुने एक्झिट पोलचे कौलदेखिल झुकलेले दिसत आहेत. राज्यात आज 7 डिसेंबराला मतदान पार पडलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेतील TRSला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, टीडीपी, तेलंगणा, जनसमिती आणि सीपीआय एकत्र आले आहेत.