Telangana Assembly Elections 2018 Exit Poll: तेलंगणामध्ये एक्झिट पोलच्या सर्वेनुसार TRS पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता

Telangana Assembly Elections 2018 :सर्वांना उत्सुकता लागली आहे ती एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात याकडे. त्यामुळे विविध वृत्तवाहिण्या, संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणतातील निकालाबाबतचे अंदाज जाहीर झाले आहेत. या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत? हे विस्ताराने जाणून घ्या...

Telangana Assembly Elections 2018 Exit Poll: तेलंगणामध्ये एक्झिट पोलच्या सर्वेनुसार TRS पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता
Telangana Assembly Elections 2018 Exit Poll | (Photo courtesy: Archived, edited and representative images)

Telangana Assembly Elections 2018 Exit Poll Results: मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान ( Rajasthan), छत्तीसगढ (Chhattisgarh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोराम (Mizoram)या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेले मतदान आज (शुक्रवार, ७ डिसेंबर) पूर्ण झाले. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आणि मिझोराम या राज्यांसाठी मतदान आगोदरच पूर्ण झाले होते. तर, राजस्थान आणि तेलंगणासाठी मतदान आज पार पडले. पाचही राज्यातील मतदानानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, तोपर्यंत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात याकडे. त्यामुळे विविध वृत्तवाहिण्या, संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणतातील निकालाबाबतचे अंदाज जाहीर झाले आहेत. या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत? हे विस्ताराने जाणून घ्या...

Times Now च्या सर्वेनुसार TRS पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

TRS: 66

Congress-TDP: 37

BJP-7

अन्य-9

आजतकच्या सर्वेनुसार तेलंगणामध्ये पुन्हा KCR म्हणजेच के चंद्रशेखर राव पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा : छत्तिसगढमध्ये कोण घेणार आघाडी? काय म्हणतोय एक्झिट पोल?)

TRS: 79-91

Congress: 21-33

अन्य: 4-31

तेलंगणामध्ये 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये TRS सत्तेमध्ये आली होती. KCR म्हणजेच के. चंद्रशेखर राव यांच्या हातामध्ये सत्ता आली होती. राज्यात आज 7 डिसेंबराला मतदान पार पडलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेतीलTRSला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, टीडीपी, तेलंगणा, जनसमिती आणि सीपीआय एकत्र आले  आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2018 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).