Sonia Gandhi Birthday: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा 9 डिसेंबरला वाढदिवस आहे. मात्र यंदा सोनिया गांधी यांनी देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील शेकऱ्यांकडून कृषी बिलाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. तर आज आंदोलक शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक दिली गेली आहे. भारत बंद सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. या बंदला राज्यातील काँग्रेस पक्षासह अन्य राजकीय पक्षांनी सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला आहे.(Bharat Bandh: शेतक-यांकडून आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' शी संबंधित 'ही' आहे महत्त्वाची माहिती)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी असे म्हटले की सोनिया गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ यंदाच्या वर्षात सोनिया गांधी वाढदिवस साजरा करणार नाहीत. डोटसरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. मंत्र्याने असे ही म्हटले की. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांना काँग्रेसकडून पूर्णपणे समर्थन दिले जाणार आहे.(कृषी कायद्याला विरोध करत शेतकर्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी Parkash Singh Badal, Sukhdev Singh Dhindsa परत करणार पद्म पुरस्कार)
Tweet:
Congress interim president Sonia Gandhi (in file pic) will not celebrate her birthday on December 9, in view of the ongoing farmer's agitation against agriculture bills & #COVID19 situation across the country. pic.twitter.com/ivURWapgam
— ANI (@ANI) December 8, 2020
दरम्यान, सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 मध्ये इटली येथे झाला होता. काँग्रेस पक्षात त्यांची नेहमीच महत्वाची भुमिका राहिली आहे. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या त्या पत्नी आहेत. काँग्रेसच्या इतिहासात त्यांनीच दीर्घकाळ अध्यक्षपद सांभाळले आहे. ऐवढेच नाही तर सोनिया गांधी यांचे नाव फोर्ब्स मध्ये सर्वात श्रेष्ठ महिलांच्या यादीत आहे. त्याचसोबत युपीतील रायबरेली येथील सोनिया गांधी खासदार आहेत.