Parkash Singh Badal and Sukhdev Singh Dhindsa (Photo Credits: ANI and PTI/File)

दिल्ली मध्ये सध्या कृषी कायद्याला (Farm Law) विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यामध्ये बोलणी सुरू असली तरीही सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला असल्याची भावना व्यक्त करत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल (Parkash Singh Badal) आणि त्यांच्यापाठोपाठ सुखदेव सिंग ढिंडसा (Sukhdev Singh Dhindsa)  यांनी आपले पद्म पुरस्कार सरकारला परत करण्याची माहिती दिली आहे. दरम्यान 92 वर्षीय Parkash Singh Badal हे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आहेत. तर सुखदेव सिंग ढिंडसा हे राज्यसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दल डेमोक्रॅटिकचे प्रमुख आहेत. Agriculture Laws 2020: राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा म्हणाले 'भारतातील लोकशाही मेली आहे, हा घ्या पुरावा'.

प्रकाश सिंग हे पंजाबमधील जुने जाणते नेते आहेत. केंद्र सरकारमध्ये ते एनडीए सरकारमध्ये ते भाजपा सोबत होते मात्र सप्टेंबर महिन्यातच त्यांनी कृषी कायद्यावरूनच भाजपा प्रणित सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्यांनी सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केल्याचं सांगत पद्म विभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

ANI Tweet

प्रकाश सिंग बादल यांच्या पाठोपाठ शिरोमणि अकाली दल (डेमोक्रेटिक) चे प्रमुख आणि राज्यसभा खासदार सुखदेव सिंह ढींडसा यांनी देखील कृषी कायद्याला विरोध करत पद्म भूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

सध्या विज्ञान भवन मध्ये 40 शेतकरी नेते आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. यावेळी लंच ब्रेक मध्येही सरकारकडून करण्यात आलेल्या जेवणावर बहिष्कार घालत नेत्यांनी त्यांच्याकडून जेवण वाटून घेतल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत.