यंदाच्या लोकसभा निवडणुकीतुन (Lok Sabha Elections) भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांचं नाव बरंच चर्चेत आलं आहे, दुर्दैव म्हणजे त्यांची ही ख्याती बेताल वक्तव्यासाठी अधिक पाहायला मिळाली होती. कधी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा मारेकरी नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांना देशभक्त म्ह्णून तर कधी शहीद हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्यावर टिपण्णी करून प्रज्ञा यांचं वादग्रस्त विधानांचं सत्र सुरू होतं, यामध्येच भर टाकत अलीकडे त्यांनी आपल्याला खासदार का बनवला आहे याबाबत वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलता असताना "आम्ही गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही, तुम्हाला स्वतःला तरी अशी कामे करणारा खासदार चालणार आहे का? ज्यासाठी आम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू, असे साध्वी यांनी म्हंटले आहे.
याबाबतचा एका व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, तसेच या विधानाने त्यांनी एकाअर्थी नरेंद्र मोदींच्या स्वछता अभियानाला देखील टोला लगावल्याची चर्चा होत आहे. Black Magic: सरकार वाचावे म्हणून जेडीएस करत आहे भाजप वर काळी जादू? जेष्ठ नेते लिंबू घेऊन फिरताना आढळले
पहा काय म्हणयतायत साध्वी प्रज्ञा
#WATCH BJP MP from Bhopal, Pragya Thakur in Sehore: Hum naali saaf karwane ke liye nahi bane hain. Hum aapka shauchalaya saaf karne ke liye bilkul nahi banaye gaye hain. Hum jis kaam ke liye banaye gaye hain, vo kaam hum imaandaari se karenge. #MadhyaPradesh pic.twitter.com/VT4pcGKkYx
— ANI (@ANI) July 21, 2019
अशा प्रकारे आक्षेपार्ह्य बोलण्याची साध्वी यांची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी सुद्धा 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्यावर ताशेरे ओढत साध्वी यांनी आपल्या शापामुळे करकरे यांचा अंत झाला असे म्हंटले होते, यावर माध्यमातून शिवाय राजकीय स्तरावर भाजप मधून सुद्धा बरीच टीका झाली होती. स्वतः मोदींनी सुद्धा यावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मारणाऱ्या गोडसे यांना देशभक्त म्हणण्यासाठी आपण साध्वी यांना कधीच माफ करू शकणार आहे अशा शब्दात सुनावले होते . ज्यांनंतर आपण पक्षाची शिस्त पालन करण्यासाठी आपलं म्हणणं मागे घेत आहोत असे म्हणत त्यांनी माफी मागितली होती. Videos: काँग्रेस कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांचा पोलिसांसोबत राडा; मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथील घटना
दरम्यान सध्या व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओत साध्वी यांच्या मतावर त्यांना खासदारांचे नेमके काय काम आहे असे सवाल नेटकऱ्यांकडून केले जात आहेत. तसेच याबाबत भाजपा कडून काही दखल घेतली जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे