Rajya Sabha (Photo Credits: ANI)

Rajya Sabha Election 2020: राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या 55 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आजच (मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020) ही घोषणा केली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, एकूण 17 राज्यातील खासदारांचा राज्यसभा कार्यकाळ एप्रील 2020 मध्ये समाप्त होत आहे. कार्यकाळ समाप्त होत असलेल्या सदस्यांची सर्वाधिक सख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 7, तामिळनाडू 6, पश्चिम बंगाल आणि बिहार प्रत्येकी 5, गुजरात आणि आंध्र प्रदेश, राजस्थान प्रत्येकी 3 यांसह इतरही राज्यांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ समाप्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काही प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, हरदीप पुरी, दिल्ली भाजपा नेता विजय गोयल, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

राज्यसभेतील एकून पक्षीय बलाबल पाहता एनडीए आणि इतर मित्रपक्षांची सदस्य संख्या 106 इतकी आहे. तर, एकट्या भाजपची सदस्य संख्या 82 इतकी आहे. एकूण 425 सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 123 सदस्यांची आवश्यकता आहे. दरम्यान, 2018 आणि 2019 मध्ये भाजपला काही राज्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्याचा थेट परिणाम राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीवर पडू शकतो. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि त्यांचे सहकारी मित्रपक्षांची स्थिती 245 सदस्यांच्या राज्यसभेत काहीशी सुधारलेली आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Elections 2020: राज्यसभेवर महाराष्ट्रातून कोणाची वर्णी? शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, हंसराज अहीर यांच्यात चूरस)

राज्याचे नाव आणि रिक्त होणाऱ्या सदस्यांची संख्या

महाराष्ट्र-7

ओडीसा - 4

पश्चिम बंगाल- 6

आंध्र प्रदेश - 4

तेलंगणा - 2

असाम - 3

बिहार - 5

छत्तीसगढ - 2

गुजरात - 4

हरियाणा - 2

हिमाचल प्रदेश - 1

झारखंड - 2

मध्यप्रदेश - 3

मनिपूर - 1

राजस्थान - 3

मेघालय - 1

एएनआय ट्विट

राज्यसभेतील संख्याबळ पाहता भाजपकडे 83 तर काँग्रेसकडे 45 सदस्य आहेत. त्यामुळे बहुमताचे गणीत जुळवायचे तर भाजपला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रात सत्तांदर झाल्याने विरोधकांना आपली सदस्य संख्या वाढविण्याची जोरदार संधी आहे. त्यामुळे भाजपला 182 हा आकडा गाठण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार हे नक्की आहे.