जगभरात कोरोना व्हायरस ने हैदोस घातला असून मृत्यूचे जणून तांडवच सुरु केले आहे. आतापर्यंत जगभरात 25 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी सर्व देश एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत असून भारतात एकजुटीने सुरु असलेल्या लढ्याची जगभरातून कौतुक केले जात आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मोलाचा वाटा असून अन्य देशांना भारताकडून औषधे पुरविण्याचे कामही मोदींच्या आदेशावरून होत आहे. त्यामुळे मोदींचे प्रत्येक निर्णय आणि आलेल्या संकटावर मात करण्याची जिद्द याची संपूर्ण जगभरातून वाहवा होत आहे. त्यामुळे ही लोकप्रियतेच्या बाबतीत नरेंद्र मोदी जगभरातून अव्वल स्थानी आले आहेत. त्यांची लोकप्रियता 63 टक्क्यांवरून 68 टक्क्यांवर पोहोचली आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण संकटात मोदींनी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि भूमिका कारणीभूत ठरली आहे. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदीं नी 25 मार्चला देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र सद्य स्थिती पाहून त्यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला आहे. Lockdown Extended: लॉकडाउन काळात कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला 7 नियमांचा हा मास्टरप्लॅन; जाणून घ्या सविस्तर
त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, मन की बात च्या माध्यमातून जनतेला अशा स्थितीत एकजूट राहण्याचा संदेश देत आहे. जे सर्व देशांसाठी उत्तम उदाहरण आहे. हा सर्वे अमेरिकेच्या ग्लोबल डेटा इंटेलिजेंस कंपनी मॉर्निंग कनसल्ट कडून केले गेले आहे. ज्यात 14 एप्रिल ला ही रेटिंग 68 टक्के झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर यात सर्वात कमी रेटिंग ही जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना मिळाली आहे.
भारतात गेल्या 24 तासात देशात 1383 नवे रुग्ण आढळले. तर, कोरोना बाधित 50 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19,984 इतकी झाली आहे. त्यातील 3870 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.